Dhule ACB Trap । धुळे : न्यायालयाच्या आदेशानुसार जन्म तारखेची नोंद ग्रामपंचायत कार्यालयाच्या दप्तरी घेण्यासाठी ग्रामसेवकाने विलंब शुल्काच्या नावाखाली 1400 रुपयांची लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फोनवरुन तक्रार नोंदवली. त्यानंतर मागणी केलेली 1400 रुपयांची लाच स्विकारताना एसीबीच्याा पथकाने आरोपी ग्रामसेवकाला अटक केली. (Gram sevak demanded a bribe of Rs 1400 to record the date of birth)
गुलाब रामदास चौधरी (Gulab Ramdas Chaudhary) (वय 44,रा बालाजी नगर, घर क 21, सोनगीर, ता. जि. धुळे) असे अटक केलेल्या व्यवसाय ग्रामसेवक ग्रामसेवकाचे नाव आहे. (Gram sevak demanded a bribe of Rs 1400 to record the date of birth)
ही कारवाई ला.प्र.वि.धुळे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा भूषण शेटे, रामदास बारेला, प्रशांत बागुल ,मकरंद पाटील,प्रविण पाटील,मपोशी गायत्री पाटील,रोहिणी पवार वनश्री बोरसे, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली. (Gram sevak demanded a bribe of Rs 1400 to record the date of birth)