राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक विजयी
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजयी झाले आहेत. शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या नाटयमय घडामोडीनंतर मतमोजणीला सुरूवात झाली. (Dhananjay Mahadik wins sixth Rajya Sabha seat)
निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही,
तर जिंकण्यासाठी लढविली होती…
जय महाराष्ट्र ! #RajyaSabhaElections2022 #Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 10, 2022
दरम्यान, भाजपच्या धनंजय महाडिकांचा हा विजय आणि शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव हा महाविकास आघाडीच्या, खासकरून शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. सहाव्या जागेसाठी मतदान करताना महाविकास आघाडीची सहा मतं फुटल्याचे स्पष्ट झालं आहे. (Dhananjay Mahadik wins sixth Rajya Sabha seat)
‘निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’ असे देवेंद्र फडणवीसांनी विजयानंतर ट्वीट केले आहे. सुरुवातीपासून शिवसेनेच्या संजय पवारांचे पारडे जड असतानाही शेवटी भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. (Dhananjay Mahadik wins sixth Rajya Sabha seat)