नांदेड-तिरूपती विमान प्रवासासाठी “इतके” मोजावे लागतील पैसे

नांदेड : नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातून हजारो भाविक श्री तिरूपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी जातात. (Thousands of devotees from Marathwada visit Shri Tirupati Balaji) विमानसेवा नसल्याने भाविकांना रेल्वे किंवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी विमानसेवा सुरु करा, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण (Public Works Minister and Guardian Minister Ashokrao Chavan) यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आता नांदेड – तिरूपती व्हाया हैदराबाद ही विमानसेवा सुरू करण्यात आली. (Nanded -Tirupati via Hyderabad flight resumed)

 

 

नांदेड येथे गुरू-ता-गद्दीच्या काळात 2008 मध्ये श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळाची उभारणी करण्यात आली. या विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा उपलब्ध आहे. सध्या नांदेड शहर हे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, कोल्हापूर या महानगरांशी विमानाने जोडले आहे. यात आता तिरूपतीची भर पडली आहे. नांदेडहून तिरूपतीकडे जाणाऱ्या भाविकांची थेट विमानसेवा मिळणार आहे. सध्या सुरु असलेल्या विमानसेवेचा विस्तार करत ती आता तिरूपतीपर्यंत वाढविण्यात आली आहे. मंगळवार, बुधवार, गुरूवार या दिवशी हे विमान श्री तिरूपती- हैदराबाद-नांदेड-मुंबई – कोल्हापूर असा प्रवास करून त्याच दिवशी त्याच मार्गाने परतीच्या प्रवासासाठी तिरूपतीकडे निघणार आहे. (The flight will depart from Shri Tirupati-Hyderabad-Nanded-Mumbai-Kolhapur and return to Tirupati on the same day on the same route.)

 

विमानीची वेळ

तीन्ही दिवशी सायंकाळी 6.10 मिनिटाला हे विमान नांदेड येथून निघून रात्री 9.10 मिनिटाला ते तिरूपती येथे पोहोचेल. तर तिरूपतीहून याच दिवशी सकाळी 7.05 वाजता तिरूपतीहून निघणारे हे विमान नांदेडला सकाळी 10.25 मिनिटाला पोहचणार आहे. (Thousands of devotees from Marathwada visit Shri Tirupati Balaji) त्यानंतर मुंबई – कोल्हापूरसाठी आकाशात झेपावणार आहे. या विमानाचे किमान भाडे 3,999 रुपये आकारण्यात आले. (The minimum fare was Rs 3,999)

Local ad 1