...

(Dr. Sambhaji Panpatte) मिरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त डाॅ. संभाजी पानपट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

कंधार : तालुक्यातील काटकळंबा येथील भूमिपुत्र तथा मिरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त डाॅ. संभाजी पानपट्टे (Deputy Commissioner of Mira-Bhayandar Municipal Corporation (MBMC) Sambhaji Panpatte) यांच्या वाढदिवसानिमित्त मुस्लिम नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने ईदगामध्ये वृक्षरोपण करण्यात आले. Dr. Sambhaji Panpatte
काटकळंबा येथील मुस्लिम तरुणांनी ईदगाह परिसराला बागेत रुपांतर केले असून, याठिकाणी विविध प्रजातीचे वृक्ष रोपण केले असून, त्याचे संगोपन करत आहेत.  या कार्याला भूमिपुत्र तथा मिरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त डाॅ. संभाजी पानपट्टे यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी बाग फुलविण्यासाठी कोणती वृक्ष लावावित आणि कोणते लावु नयेत याविषयी सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. (Dr. Sambhaji Panpatte)

डाॅ. पानपट्टे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मुस्लिम नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने वृक्षरोपण केले. यावेळी ज्येष्ठ नागरीक अमीर पठाण, ग्रामपंचायत सदस्य वजीर पठाण, तय्यब शेख, मन्सुर पाठाण, युनिस शेख, नवाज सय्यद, युसुफ सय्यद, अतमस पठाण, म्हैबुब पठाण व पाशा पठाण उपस्थित होते. (Dr. Sambhaji Panpatte)

Local ad 1