...

आर.आर. आबांसारखा सहकारी, मित्र सोबत नसल्याचं दु:ख कायमच राहील : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : “महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्वं, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील आबांना (R.R.Patil) जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली. ग्रामीण विकासाची आस, तंटामुक्त समाजाचा ध्यास घेऊन आर. आर. आबांनी राबवलेलं प्रत्येक अभियान लोकचळवळ बनलं. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त भरतीप्रक्रियेच्या आबांच्या निर्णयानं हजारो गरीब युवकांना पोलिस दलाची दारं खुली करुन दिली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (deputy cm ajit pawar) आर.आर.पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. (Deputy Chief Minister Ajit Pawar-RR Patil)

 

डान्सबार बंदी, गुटखाबंदीच्या त्याच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या वाचवल्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आर. आर. आबांनी यशस्वीपणे केले. शहरी, ग्रामीण भागातील प्रत्येकाला आदर असलेले, आपलंसं वाटणारे त्यांचे नेतृत्वं होते. महाराष्ट्राच्या राजकारणातला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला माझा सहकारी, जवळचा मित्र आज आपल्यासोबत नाही, याची खंत, दु:ख कायम मनात राहणार आहे. स्वर्गीय आर. आर. आबांच्या स्मृतींना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.” (Deputy Chief Minister Ajit Pawar-RR Patil)

 

Local ad 1