Collector’s office to protest । कुरेशी समाजावरील अन्यायाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Collector’s office to protest । पुणे : कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांना काहीजण जाणूबुजून  त्रास देत असून, काही ठिकाणी मारहाण करत आहेत. मारहाण कारणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमिटीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. (Demonstrations in front of Collector’s office to protest the injustice done to the Qureshi community)

 

 

यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊ, असे अश्वासन शिष्टमंडळाला दिले.

 

आंदोलनात ऑल इंडिया जमियतुल कुरेशी एक्शन कमिटीचे (All India Jamiatul Qureshi Action Committee) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी, शहराध्यक्ष हसन कुरेशी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील (Raghunathdada Patil, leader of Farmers’ Association) , माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण, वंचित आघाडीचे अध्यक्ष मुनवर कुरेशी, लहुजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हतागाळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, अंजूमभाई इनामदार, जुबेर बाबू यासह पुणे शहरातील विविध पक्ष संघटना व मुस्लिम समाजाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होत.

 

पावसाची अनियमितता कायम दुष्काळी परिस्थिती अशा वेळी भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना अतिशय अवघड आणि कष्टाचे जात असून राज्य सरकारने भाकड जनावरे सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

 

यावेळी पुणे जिल्ह्यातील ब्रिटीशकालीन कत्तलखाने चालू करावे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमचा मुद्देमाल परत मिळावा ,आमचा व्यवसाय करीत असताना गुंड प्रवूर्तीकडून होणारा अन्याय अत्याचार तात्काळ थांबवावा महाराष्ट्र सरकारने कुरेशी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

Local ad 1