विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार जाणार न्यायालयात ; उमेदवारांनी घेतली शरद पवारांची भेट 

पुणे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी इव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Senior leader Sharad Pawar) यांच्या पुढाकाराने यासंदर्भात दिल्लीत झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal of Aam Aadmi Party) तसेच काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार अभिषेक मनू सिंघवी (MP Abhishek Manu Singhvi) त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (Defeated candidates in assembly elections will go to court)