मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र सरकारने (Central Government) पट्रोलवरील अबकारी कर (Excise tax) पाच रुपये तर डिझेलवरील कर दहा रुपयांनी कमी केला आहे. त्यामुळे काहींसा दिलासा मिळाला असून, आता राज्य सरकारने आपल्याला मिळणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करावी, अशी मागणी होत आहे. त्यावर किती टक्के व्हॅट कमी करावा, याविषयी आज सोमवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्यात बैठक होणार आहे. त्यात निर्णय घेतला जाऊ शकतोे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
*पीक विम्याची रक्कम आज बँकेत होणार जमा*
*दुपारनंतर बँक खाते चेक करा*
पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या अखत्यारी बाहेर गेले आहेत. दरवाढीचा त्याचा महागाईवर होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार विरोधात असंतोष वाढत होता, त्यातच देशात लोकसभा आणि विधानसभा पोट निवडणुकीत भाजपला झटका बसला. त्याच्यानंतर केंद्रातील भाजप सरकार खडबडून जागे झाले. इधनावर मिळणाऱ्या अबकारी कर कमी करत असल्याची घोषणा केली असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यापाठोपाठ देशातील भाजप शासित राज्यांनी व्हॅट कमी आले. त्यामुळे काही राज्यात पेट्रोल, डिझेल 100 रुपयांच्या आत प्रति लिटर आले आहेत. यानंतर आता बिगर भाजप शासित राज्यकांडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात विरोधकांनी व्हॅटमध्ये पाच रुपयांची कपात करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार त्यातून कसा मार्ग काढणार, याची उत्सुकता लागली आहे.
केंद्र सरकारने (Central Government) इंधनावरील (Fuel) अबकारी करात (Excise tax) कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही इंधनावरील व्हॅट (VAT) पाच रुपयांनी कमी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने इंधनावरील टॅक्स दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (Decision to reduce VAT on petrol and diesel today?)