...

IAS Dr. Anil Ramod। डॉ.अनिल रामोड यांच्या जामिनावर आज फैसला !

IAS Dr. Anil Ramod ।  पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त डाॅ.अनिल रामोड (IAS) हे सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत येरवडा मध्यवर्ती कारागृह (Yerawada Central Jail) आहेत. त्यांनी वकीलामार्फत सीबीआय न्यायालयात जामानिसाठी अर्ज (Application for bail in CBI court) केला आहे. त्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे डाॅ. रामोड यांना आज जामिन मिळतो की, अजून येरवडा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढतो, हे आज दुपारी स्पष्ट होईल. (Decision on the bail of IAS Dr. Anil Ramod today !)

 

डाॅ. रामोड यांच्या अडचणीत होणार वाढ? ; वढू येथील वर्ग-२ च्या जमीन प्रकरणात आता सीबीआयची एन्ट्री

 

 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority) भूसंपादनातील शेतकऱ्यांच्या लवादाचे प्रकरणांवर विभागीय अतिरिक्त आयुक्त डाॅ. अनिल रामोड यांच्याकडे सुनावण्या होत होत्या. भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याच्या एकूण रक्कमेपैकी 10 टक्के रक्कम लाच म्हणून मागणी केली. तडजोडीनंतर आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अतिरीक्त विभागीय आयुक्त डाॅ. रामोड यांना सीबीआयने कार्यालयीन दालनातच रंगेहात पकडले.(Additional Divisional Commissioner Dr. while accepting a bribe of eight lakh rupees. Accepted Ramod) त्यानंतर विविध ठिकाणी टाकलेल्या छापा सत्रातून सुमारे पावणे सात कोटींची रोकड (About 6.75 crore cash seized) मिळाली आहे. तर स्थावर मालमत्ता वेगळ्या आहेत.

 

 

 

डाॅ. रामोड यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तीन दिवसांची कोठडी सुनावणी होती. त्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (14 days judicial custody) सुनावली. त्यानंतर डाॅ. रामोड यांनी आपल्या वकिलामार्फत सीबीआय न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. त्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामध्येच डाॅ. रामोड यांना जामिन मिळतो की, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढतो हे स्पष्ट होणार आहे.

Local ad 1