मुंबई : वार्षिक बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर (Rates of Ready Reckoner) प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जगंम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात. मात्र, यंदा कोणतीही त्यात दरवाढ न करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. (Decision not to increase the rates of Ready Reckoner)
क्रेडाई, विकासक व इतर सामान्य नागरिकांकडून जमीन व इमारत या मिळकतींच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात येऊ नये, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात येत होती. या निवेदनांचा सकारात्मक विचार करुन रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil) यांनी सांगितले. (Decision not to increase the rates of Ready Reckoner)
येत्या आर्थिक वर्षात (financial year) म्हणजेच सन २०२३-२४ च्या वार्षिक दर विवरणपत्र दरात कोणताही बदल न करता ते मागील वर्षाप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. रेडी रेकनरचे दर स्थिर ठेवल्यामुळे मालमत्ता खरेदी व विक्री करणाऱ्या दोघांनाही फायदा होतो. सामान्य नागरिकांना घर खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळते. (Decision not to increase the rates of Ready Reckoner)
तसेच बांधकाम व्यावसायिक, घरकुल विकासक, रिअल इस्टेटमध्ये (Builders, Home Developers, Real Estate) काम करणारे मध्यस्थ, वकिल व सल्लागार आणि स्थावर मालमत्ता धारकांच्या व्यवसायात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन खरेदी-विक्रीस चालना मिळते. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या बाबी विचारात घेऊन शासनाने सन 2023-24 च्या रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे विखे- पाटील यांनी सांगितले.