शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन दिवसांपासून बाबासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांचे निधन झाल्याचे सोमवारी सकाळी रुग्णालय प्रशासनाने अधिकृतरित्या जाहीर केले आहे. (Death of Shivshahir Babasaheb Purandare)

 

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी सासवड येथे झाला. त्यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक दस्ताऐवज, गडकिल्ले, मराठा सम्राज्याचा अभ्यास केला. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळासोबत सुद्धा त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम केले होते. (Death of Shivshahir Babasaheb Purandare)

19 ऑगस्ट 2015 रोजी त्यांच्या 93 व्या वाढदिवशी त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होतेआणि 2019 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यासारख्या अनेक लहान मोठ्या पुरस्कारांनी बाबांना सन्मानित करण्यात आले होते. (Death of Shivshahir Babasaheb Purandare)

Local ad 1