खबरदार : “डेल्टा पल्स व्हेरिएंट”ला हलक्यात घेऊ नका ; लसींचे दोन्ही डोस घेणाऱ्या महिलेचा मृत्यू
मुंबई (MH TIMES NEWS NETWORK) : कोरोना विषाणुची रुग्ण संख्या कमी झाल्याने राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत अनेक ठिकाणचे निर्बंध शिथिल केले असून, त्याची अमंलबजावणी उद्या रविवारपासून केली जाणार आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेणाऱ्या एका महिलेला डेल्टा पल्स व्हेरिएंटला विषाणुची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. (Death of a woman infected with the Delta Pulse variant) त्यामुळे डेल्टा पल्स व्हेरिएंट विषाणुला (Delta pulse variant) हलक्यात घेऊ नका. कोरोनापासून बचाव करणारे मास्क,सोशल डिस्टेंस आणि सॅनिटाझर वापरा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (Masks,social distances and sanitizers must be used.)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. (Accelerate corona vaccination or the Delta type could become more lethal, the World Health Organization has warned.)
गुरुवारी डेल्टा पल्स व्हेरिएंटला विषाणुची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. महत्त्वाचे म्हणजे या महिलेने कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले होते. या माहितीला राज्याच्या आरोग्य विभागाने दुजोरा दिला असून आरोय यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. संबंधित महिलेवर अतिदक्षता विभागात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान या महिलेच्या कुटुंबातील ६ जणांना करोना संसर्गाची लागण झाली असून त्यातील दोन जण डेल्टा प्लस विषाणू बाधित असल्याची धक्कादाय माहिती समोर आली. (Death of a woman infected with the Delta Pulse variant)
डेल्टा पल्स व्हेरिएंट बाधितांची संख्या 66 वर
रुग्णाच्या निकट सहवासितांपैकी कोणाला कोरोनाची लक्षणे असल्यास त्यांची चाचाणी केली जात आहे. फ्ल्यू सदृश्य आजाराचे आणि सारी आजाराचे सर्वेक्षण पुनः संसर्ग झालेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. डेल्टा प्लस रुग्णांमध्ये सर्वाधिक 33 रुग्ण 19 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील आहेत. तर त्या खालोखाल 46 ते 60 वर्षे वयोगटातील 18 रुग्ण आहेत. या मध्ये 18 वर्षांखालील 7 बालके असून 60 वर्षांवरील 8 रुग्ण आहेत. या रुग्णांपैकी 31 रुग्ण हे लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असणारे असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासली नाही. 66 रुणांपैकी 61 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले आहेत. (Death of a woman infected with the Delta Pulse variant)
भिती बाळगू नका..
विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग असून या संदर्भात जनतेने कोणतीही भिती न बाळगता कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. (Death of a woman infected with the Delta Pulse variant)