PUNE ACB TRAP NEWS । MBBS प्रवेशासाठी दहा लाखांची लाच स्वीकारताना वैद्यकिय महाविद्यालयाचा डिन एसीबीाच्या जाळ्यात
PUNE ACB TRAP NEWS: NEET परिक्षा-२०२३ मध्ये उत्तीर्ण होईन पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयात (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College) MBBS ला नंबर लागला होता. असे असताना MBBS ला प्रवेश देण्यासाठी वैद्यकिय महाविद्यालयाच्या डीनने 16 लाख रुपयांची लाच मागितली. त्यातील दहा लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Bribery Department) पथकाने अटक केली आहे. (Dean of medical college of health department of Pune Municipal Corporation arrested while accepting bribe of ten lakhs)
आशिष श्रीनाथ बनगिनवार – Ashish Srinath Banginwar (वय ५४ वर्ष, अधिष्ठाता (वर्ग-१), भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे), असे अटक करण्यात आलेल्या डिनचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या मुलाने NEET परिक्षा-२०२३ मध्ये उत्तीर्ण झाला. त्याची MBBS च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयातच नंबर लागला होता. त्यामुळे तक्रारदार हे महाविद्यालयाचे डिन आशिष श्रीनाथ बनगिनवार यांना भेटले. त्यावेळी त्यांनी शासनाच्या 22 लाख 50 हजार रुपयांच्या व्यतरिक्त 16 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यासंदर्भात एसीबीकडे तक्रारदार यांनी तक्रार केली. 7 आणि 8 आगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात पहिला हप्ता म्हणून दहा लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने अटक केली.
या प्रकरणी समर्थ पोलिस ठाणे (Samarth Police Station)येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधक्षीकअमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनात उपाधीक्षक सुदाम पाचोरकर यांच्या पथकाने केली.
৭. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४
२. अन्टी कर्शन ब्युरो, पुणे – दुरध्वनी क्रमांक
३. व्हॉट्स-अप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३
– ०२० – २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५০४२३
४. वहॉट्स अप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७०০
4. A4s-goi dyspacbpune@mahapolice.gov.in
(. tange- www.acbmaharashtra.gov.in
9. sifrefa y TSTR – www.acbmaharashtra.net.in
सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उप-अधीक्षक ( प्रशासन)
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.