(Community) दासरी माला दासरी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा

हिंगोली :  माला दासरी समाजासाठी लघू महामंडळ स्थापन करावे, त्याला प्रायोगिक तत्त्वावर 100 कोटीचे आर्थिक पँकेज मंजुर करावे, अनुसूचित जातीत चाळीस व्या क्रमांकावर असलेल्या माला दासरी जाती समोर दासरी या मुळ जातीचा समावेश करण्यात यावा, जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी सन. 1950 चा जात विषयक महसुली पुरावा शिथील करावा, अशा विविध मागण्या दासरी माला दासरी समाज युवक संघटनेच्या वतीने जलसंपदा  मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. Dasari Mala Establish an independent corporation for the Dasari community

नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यात दासरी माला दासरी समाजासाठी राजा भक्त प्रल्हाद सांस्कृतिक त्रिभुवन बांधकामासाठी शासकीय निधी उपलब्ध करून देण्यात यावा, कुंकू- उघोग प्रक्रिया केंद्र स्थापन करून दासरी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्या, पंरपंरागत कुंकू दाशिना गृहोपयोगी व्यवसायासाठी भांडवल उभारणी करण्यासाठी प्रत्येक कुंटूब दिड लाख शासकीय अनुदान देण्यात यावे, तसेच विशेष शासकीय योजना सुरू करण्यात यावी, दासरी माला दासरी समाजाचे आराध्य कुलदैवत भगवान श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी जयंती निमित्त दरवर्षी शासकीय सुट्टी जाहीर करावी, दासरी माला दासरी समाजाच्या साहित्य, संस्कृती, प्रतिक, चिन्ह व इतिहास ह्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दासरी माला दासरी समाज इतिहास संशोधन मंडळ स्थापन करण्यात यावे, आदी मागण्याचे निवेदन हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे जयंत पाटील यांना देण्यात आले. Dasari Mala Establish an independent corporation for the Dasari community

दासरी माला दासरी समाज युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर चेपूरवार, दिलीप चेपूरवार, साईनाथ चेपूरवार, प्रा.आशिष चेपूरवार, कृष्णा चेपूरवार, पवन सादुलवार, विकास चेपूरवार, परमेश्वर ओलमवार,  राम बोंपिलवार, जयराम बोंपिलवार, राम चेपूरवार, लक्ष्मण चेपूरवार,श्याम चेपूरवार, शंकर चेपूरवार, बालाजी चेपूरवार, आकाश चेपूरवार, निशान बोंपिलवार आदी उपस्थित होते. Dasari Mala Establish an independent corporation for the Dasari community

Local ad 1