नांदेड : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर (mahurgad) लिफ्ट सह स्कायवॉकची सुविधा अवघ्या 18 महिन्यात भक्तांना उपलब्ध होणार आहे. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, भक्तांसाठी अत्यावश्यक असलेल्या या सुविधेच्या निर्मितीचे भूमीपूजन केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते शनिवारी झाले. (Darshan of Sri Renuka Devi will be easy; Bhoomipujan of Skywalk work with lift)
नागपूर येथून माहूर येथे पोहचण्यासाठी लहानपणी आम्हाला आठ तास लागायचे. आजच्या घडीला नागपूर ते माहूर हे अंतर अवघ्या अडीच तासात पार करणे सुकर झाले असून माझ्या आई-वडिलांची उतरत्या वयात जी इच्छा होती ती आता पूर्णत्वास येत असल्याने मला मनस्वी आनंद होत असल्याची भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. श्रीक्षेत्र माहूर गडावर अबाल वृद्धांसह दिव्यांग व सर्व भक्तांना सुकर ठरणाऱ्या लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकाम योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना स्मरत भावनेचा बांध मोकळा केला.
माहूर येथे आज त्यांनी सपत्निक परिवारासह श्री रेणुका देवीची पुजा करून माहूरच्या विकासाला व रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्प श्रीक्षेत्र माहूरगड श्री रेणुका देवी मंदिर लिफ्टसह स्कायवॉकचे बांधकामाचे भूमिपूजन केले. माहूर गडाच्या पायथ्याशी या भूमिपूजन समारंभानिमित्त उभारण्यात आलेल्या व्यासपिठावरून ते बोलत होते. (Darshan of Sri Renuka Devi will be easy; Bhoomipujan of Skywalk work with lift)
Related Posts
यावेळी श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर (Shri Renuka Devi Sanstha President and Chief District Judge Nagesh Nhavkar), खासदार हेमंत पाटील, आमदार भिमराव केराम, आमदार राम पाटील रातोळीकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. शामसुंदर शिंदे (MP Hemant Patil, MLA Bhimrao Keram, MLA Ram Patil Ratolikar, Mr. Dr. Tushar Rathod, Mr. Shamsundar Shinde), जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, किनवटच्या उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर , माहूर नगरपंचायत चे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, व्यंकटेश गोजेगावकर, श्री रेणुका देवीसंस्थाचे सर्व सन्माननिय ट्रस्टी सदस्य आदी उपस्थित होते.
सन 2004 साली एका अपघातात माझ्या पायाला चार फॅक्चर झाले होते. त्यानंतर मी दर्शनाला खुर्ची घेऊन गेलो होतो. आज गडावर मी श्री रेणुकादेवी मातेच्या दर्शनाला पायी गेलो. माझ्या आईला उरत्या वयात गडावर येऊन दर्शन घेणे सोपे नव्हते. भावनेचा हा धागा पकडत त्यांनी लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्पाचे भूमिपूजन करतांना माझ्या मनात कृतज्ञतेच्या भावना अधिक असल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.
तीर्थक्षेत्राच्या विकासासमवेत पर्यटन व अनुषंगिक सेवाक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होते. तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी पहिली अट ही स्वच्छतेची असते. शेगाव, शिर्डी, तिरूपती हे तीर्थक्षेत्रातील स्वच्छतेचे आदर्श मापदंड असून माहूर हे तीर्थक्षेत्र सुद्धा स्वच्छतेच्यादृष्टिने नावाजले जावे यासाठी नगरपरिषदेने व माहूरच्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. माहूर येथे वनसंपदा, जैवविविधता आणि सुंदर डोंगराळ भाग असल्याने पर्यटन क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध आहे. माहूरच्या पायथ्याशी मोठा तलावही उपलब्ध आहे.
सर्वांच्या प्रयत्नातून याठिकाणी तलावातील पाण्याची पातळी चार मीटर पेक्षा अधिक आपण आणू शकलो तर या विस्तारीत तलावाच्या पाण्यावर प्रवाशी विमानसेवाही आपण उपलब्ध करू असा दुर्दम्य आत्मविश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखविला. या भागाला अनेक जैवविविधता लाभलेली आहे. येथील सत्व लक्षात घेता नगरपरिषदेने रस्त्याच्या दुर्तफा किमान 3 हजार झाडे लावावीत व याचबरोबर माहूर नगरातील प्रत्येक कुटुंबानी किमान तीन तरी झाडे लावावीत, असे कळकळिचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
या भागातील बेरोजगारांच्या हातांना कामे मिळावीत, आव्हानात असलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्न इतर साधणे मिळावीत, येथील ऐतिहासिक वारसा स्थळाला नव्या पिढीपर्यंत पोहचता यावे ऐवढी साधी मनिषा असून यासाठी मी श्री रेणुका देवीला प्रार्थना केल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
काम व्यवस्थित नाही झाले तर कठोर कारवाई करू
देशभरातील विविध विकास प्रकल्पांच्या कामांमध्ये काही ठिकाणी कंत्राटदारांचे अतीशय वाईट अनुभव येतात यात नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या काम करणाऱ्या काही कंत्राटदारांचाही समावेश आहे. नांदेड-किनवट मार्गातील इस्लापूर येथील पुलाच्या कामाबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. किनवटचे आमदार भिमराव केराम यांनीही यासंदर्भात जाहीर तक्रार केली आहे. याची गंभीर दखल घेऊन संबंधीत कंत्राटदारांवर बडतर्फीची कारवाई केल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. काम व्यवस्थीत झाले नाही तर आम्ही संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची पाऊले उचल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी व दुर्गम भास्क लक्षात घेता सुविधांच्या निर्मितीवर भर आवश्यक ः आमदार भिमराव केराम
किनवट, माहूर या भागात चांगल्या रस्त्याची सुविधा अपेक्षित आहे. यादृष्टिने जिल्ह्यातील आदिवासी वाड्यापर्यंत भक्कम रस्त्याचे जाळे अत्यावश्यक आहे. किनवट ते आदिलाबाद, किनवट ते नांदेड (इस्लापूर), उनकेश्वर, हिमायतनगर व विदर्भाला जोडणाऱ्या भक्कम रस्त्याचे जाळे निर्माण करण्याची मागणी आमदार भिमराव केराम यांनी केली.
प्रारंभी या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजन निमित्त कोनशिलेचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित अनावरण करण्यात आले. श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतलेल्या विविध विकास कामांना व भूमिपूजन समारंभाला शुभेच्छा दिल्या.
अशी आहेत प्रकल्पाची ठळक वैशिष्टे
- स्काय वॉकची लांबी 70 मीटर तर रुंदी 15 मीटर असेल.
- लोवर स्टेशन लिफ्ट टॉवरची उंची 25 मीटर असून एकुण 4 लिफ्टची 20 प्रवाशी क्षमता असेल.
- अपर स्टेशन लिफ्ट टॉवरची उंची 23 मीटर असून एकुण 4 लिफ्टची 20 प्रवाशी क्षमता असेल.
- या प्रकल्पाची वाहतूक क्षमता एकावेळेस 80 प्रवासी चढणे व उतरण्याची असेल.
- या प्रकल्पामध्ये एकुण 32 दुकान गाळे, प्रसाधन गृह, सुरक्षा कर्मचारी कक्ष, उपहार गृह उपलब्ध असतील.
श्री रेणुका देवी मंदिर माहूरगडसाठी लिफ्टसह स्काय वॉकचे बांधकाम करण्यास केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून एकुण 51.03 कोटी रुपयास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. स्थापत्य व विद्युतसाठी 50.60 कोटी रुपयास तांत्रिक मान्यता दिली आहे. या कामाचा कालावधी हा 18 महिने असून प्रकल्प हाताळणे व देखभाल, दुरूस्तीसाठी 10 वर्षाचा कालावधी राहील. कामाची अंदाजित किंमत ही 39 कोटी 91 लाख रुपये वस्तू व सेवाकर वगळून आहे.