(Dance party) फार्म हाऊसमध्ये दिवसा रंगली डॅन्सपार्टी

पुणे : “पुणे तिथे काय उणे” ही म्हण पुन्हा खरी ठरली. काही दिवसापुर्वी एका  फॅर्म हाऊसमध्ये मुली नाचवल्या जात होत्या. त्यात एका महापालिकेच्या अभियंत्याला निलंबित व्हावं लागलं. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एका फार्म हाऊसमध्ये भरदिवसा मुले-मुली डॅन्स करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी टाकलेल्या छापत्यात तेरा जणांना अटक केली.  (Dance party at Pune farmhouse)

पुणे-सातारा महामार्गावर केळवडे (ता. भोर) गावच्या हद्दीत दुमजली फार्म हाऊसवरील बंगल्यामध्ये पैशाची उधळण करत मुला-मुलींचा डान्स सुरू होता. राजगड पोलीसांनी शनिवारी (दि.29) केळावडे येथील सुमित प्रकाश साप्ते (रा. गाऊडदरा, ता. हवेली) यांच्या मालकीच्या केळवडे येथे असलेल्या दुमजली बंगल्यामध्ये रंगीबेरंगी लाईटचा उजेड करून व मोठ्या आवाजाचा साऊंड लावून मुलं आणि मुली नृत्य करीत होत्या. या फार्म हाऊसवर डान्स चालू असून पैशाची उधळण सुरू आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. ही माहिती त्यांनी राजगड पोलीस ठाण्यात तातडीने कळविली. त्यानंतर शनिवारी (दि. २९) दुपारी सव्वा दोन वाजता पोलिसांनी फार्म हाऊसवर छापा टाकला. त्यावेळी ही धक्कादाय बाब समोर आली.   (Dance party at Pune farmhouse)


  फार्म हाऊसमधून सागर रमेश जाधव (वय ३२, रा. खडकवासला कॅनॉल शेजारी, हवेली), सुनील निवृत्ती पाठक (वय ३३, रा. दत्तनगर गणेश मंदिराशेजारी धनकवडी, पुणे), विकी वसंत शेलार (वय २५, रा. केळवडे, ता. भोर), गणेश विजय कदम (वय ३३, रा. पद्मावती मंदिराशेजारी पद्मावती, पुणे), अविनाश संजय साखरकर (वय २४, रा. विश्रांतवाडी घोलप वस्ती गणेश मंदिराजवळ, पुणे), विशाल गणेश पासलकर (वय ३८, रा. निलगिरी कंपाऊंड आंबेगाव पठार, पुणे), सचिन लक्ष्‍मण शिंदे (वय ३७, रा. धनकवडी पोलीस चौकी शेजारी फाईव्हस्टार सोसायटी पुणे) या मुलांसह पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ५ आणि ठाणे जिल्ह्यातील एका मुलीला ताब्यात घेतले. (Dance party at Pune farmhouse)  

उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्यासह उपनिरिक्षक  श्रीकांत जोशी, हवालदार एस. एन. कार्लेकर, गायकवाड, श्रीमती एस. आर. कुतवळ, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.   (Dance party at Pune farmhouse)

Local ad 1