सध्या मान्सूनचा कालावधी सुरू असून, दरवर्षी मान्सून व मान्सूमपूर्व (Monsoon and pre-monsoon) काळात आकाशात विजेचा गडगडाट (Lightning strikes) होवून विजा पडण्याचे प्रमाण जास्त असते. विज पडून मोठया प्रमाणात जीवितहानी होवून अनेक शेतकरी (Farmers), सामान्य नागरिक याला बळी पडतात. वीज पडून जीवीत हानी होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना (Preventive measures) म्हणून पृथ्वी मंत्रालय, भारत सरकार दिल्ली (Ministry of Earth, Government of India, Delhi) यांनी दामिनी अॅप तयार केले आहे. (Damini app is a boon for farmers!)
वीज पडण्याचा 15 मिनीटापूर्वी अॅपमध्ये स्थिती दर्शविते
दामिनी अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी, कर्मचारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना दामिनी प डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करावे. तसेच या पचे जीपीएस लोकोशनचे काम करीत असून, वीज पडण्याचा 15 मिनीटापूर्वी अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.
होणारी जीवीत व वित्तहानी टाळावी
दामिनी अॅप शेतकर्यासाठी वरदान ठरणार
मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडून जीवीत हानी होते. जीवीतहानी होवू नये यासाठी नागरिकांनी व विशेषत: शेतकर्यांनी वीज पडून होणार्या धोक्यापासून वाचण्यासाठी दामिनी अॅप अवश्य वापरावे. दामिनी अॅप शेतकर्यासाठी वरदान ठरणार आहे. (Damini app is a boon for farmers!)
अलका पाटील, माहिती सहाय्यक,
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड