(The police went around with the accused as hackers) हॅकर्स म्हणून पोलिसच फिरले आरोपीसोबत (bank deta)
पुणे : बँक खातेदारांची गोपनिय माहिती चोरी करून कोट्यावधी रुपयांची आर्थिक हेराफेरी करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला. या प्रकरणात अकरा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आङेत. सुरतचा वरुण वर्मा आणि पुण्यातील अनघा मोडक हे दोघे मुख्यसुत्रधथार असल्याचे समोर आले आहे. आत्तापऱ्यंत पोलिसांना सायबर चोरट्यांकडील डेटामधून (bank deta) पाच बॅक खात्याची माहिती मिळाली असून, त्याच्यावरील आकडा 216 कोटीच्या घरात आहे. (The police went around with the accused as hackers)
सायबर पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून जप्त केलेली माहिती (डेटा) हा गुजरात (सुरत) व हैद्राबाद येथून मिळवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सायबर पोलिसांची पथके संबधीत राज्यात दाखल झाली आहेत. दरम्यान, बँक खात्याची एवढी मोठी गोपनिय माहिती आरोपींच्या हाती लागली असल्यामुळे, बँकिंग क्षेत्रातील कोणी अधिकारी यामध्ये सहभागी आहेत का? याचा देखील पोलिस तपास करत आहेत. बुधवारी अनघा अनिल मोडक (वय.40, रा. दत्तमंदीराजवळ वडगाव) हिला अटक केली. तर वरुण व बेंद्रे याला यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. (The police went around with the accused as hackers)
अनघा मोडक ही पेशाने शेअर ब्रोकर आहे. एकमेकांच्या माध्यमांतून या सर्वांचा परिचय झाल्याचे सांगण्यात आले. तर वरुण याने हा सर्व डेटा मिळवून दिला आहे. चोरीच्या डेटावरून बँक खातेदारांच्या खात्यावरील पैसे काढून देण्याची जबाबदारी अनघाने घेतली होती. डेटाच्या माध्यमातून मिळणार्या पैशापैकी काही पैसे औरंगाबाद येथील एएम न्यूजचे संचालक राजेश शर्मा आणि परमजित संधु या दोघांना हवे होते. त्यासाठी अनघा त्यांच्याकडे अडीच कोटीची मागणी करत होती. मात्र त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्यामुळे 25 लाखात त्यांना तो व्यावहार करून हवा होता. पैसे घेऊन शर्मा व संधू दोघे पुण्यात आले असता, मंगळवारी पोलिसांनी दोघांना अटक केली. (The police went around with the accused as hackers)
टोळीत सहभागी असलेल्या प्रत्येकाल वेगवेगळे काम वाटून देण्यात आले होते. डेटा मिळवून देणार्यापासून ते त्याच्या वापरातून पैसे काढून देणार्यांपर्यंत सर्वांची भूमीका वेगळी असल्याचे पोलिस तपासातून समोर आली. अनघा ही सर्वांना एकत्र करून पैसे काढून देण्याचे काम करणार होती. तर इतर संगणक अभियंते डेटावर काम करणार होते. ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी सायबर हॅकर्सची मदत देखील घेतली जात होती. सर्वांना वेगवेळा मोबदला मिळणार होता. पोलिसांनी लावलेल्या सापळ्यानुसार त्यांना टार्गेट पुर्ण झाल्याची माहिती मिळाली अन् सर्वजण एकत्र आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली.
औरंगाबाद येथील शर्मा, संधू व पुण्यातील मंकणी हे घेणार्या व्यक्तीपैकी होते. म्हणजेच डेटाच्या माध्यातून बँक खात्यातील रोकड काढल्यानंतर ती त्यांना मिळणार होती. त्यासाठी त्यांना अनघा व इतरांना पैसे द्यावे लागणार होते. असे पोलिसांनी सांगितले. (The police went around with the accused as hackers)
एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेल असा सापळा आरोपींना पकडण्यासाठी सायबर पोलिसांनी रचला. डेटा हाती आल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया करून पैसे मिळवण्याठी अनघाला हॅकर्सची गरज होती. त्यातून ती पुण्यात हॅकर्सचा शोध घेत होती. दरम्यान तीच्या शोधाची खबर सायबर पोलिसांना लागली. त्यानुसार सायबर पोलिसांनी योजना आखून आपल्यापैकी काही जणांना हॅकर्स म्हणून अनघाला भेटवले अन् जाळ्यात खेचले. अनघाला ट्रॅप करण्याबरोबरच इतर आरोपींना पुण्याकडे आणण्याचे आव्हान सायबर पोलिसांसमोर होते.
जोपर्यंत टार्गेट पुर्ण होत नाही तो पर्यंत अनघा सर्वांना पुण्यात बोलावत नव्हती. शेवटी शर्मा आणि संधू हे दोघे पैसे घेऊन पुण्यात येणार असल्याचे समजल्यानतंर सर्वांनी एकत्र येण्याचे ठरवले. पोलिस दोन दिवस हॅकर्स म्हणून अनघाच्या गाडीत फिरत होते. टोळीला अटक करण्यासाठी पोलिस चार ते पाच दिवस रात्रंदिवस काम करत होते. (The police went around with the accused as hackers)
आरोपींकडे मिळालेला डाटा हा २१६ कोटी रुपयांचा असून, केवळ ५ खात्यांशी संबंधित आहे. त्यातील एक खाते सक्रीय आहे. यातील काही आरोपींनी आपण प्रथमच अशा प्रकरणात पडल्याचे सांगितले. तर दोघा तिघांनी आम्ही यापूर्वी अशा प्रकारचे काम केल्याची कबुली दिली. त्याचा तपास करण्यात येत आहे. ज्यांची ही खाती आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून त्यांचा जबाब घेण्याचे काम सुरु आहे. यातील आणखी काही सुत्रधार असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार अधिक सुस्पष्ट होईल, असे पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले.