नांदेड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू (Curfew)
नांदेड : जिल्ह्यात शुक्रवार 13 ऑगस्टच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी (Additional District Magistrate) कार्यालयाकडून देण्यात आली आहे. (Curfew in Nanded district)
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 30 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 13 ऑगस्ट 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. (Curfew in Nanded district)