नांदेड जिल्ह्यात जमावबंदी लागू ; जमावबंदी म्हणजे काय ? जाणून घ्या

 

नांदेड : नांदेड जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू (Curfew order applied) करण्यात आला आहे. हा आदेश 17 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पर्यंत आदेश लागू असणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी  (Additional District Magistrate) कार्यालयाकडून देण्यात आली आहे. (Curfew imposed in Nanded district; What is a curfew?)

 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये (Pursuant to Section 37 (1) and (3) of the Mumbai Police Act, 1951) जिल्ह्यात 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 17 फेब्रुवारी 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. (Curfew imposed in Nanded district; What is a curfew?)

वाईन विक्रीची चर्चा । राज्य सरकारने उत्पादनात शुल्कात केली मोठी वाढ

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

(Curfew imposed in Nanded district; What is a curfew?)

 

 

 

 

कलम 144 हे CrPC म्हणजे काय? (The Code of Criminal Procedure) काय लागू केले जाते

एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे कलम लागू केले जाते. या कलमाला जमावबंदी किंवा संचारबंदी किंवा कर्फ्यू असेही म्हणतात. जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी नोटिफिकेशन जारी करून जमावबंदीचे आदेश देऊ शकतात. कलम 144 लागू असलेल्या परिसरात हत्यारांची ने-आण करण्यावरही बंदी असते. वर उल्लेख केलेले अधिकारी एखाद्या विशिष्ट परिसरातील कुठल्याही व्यक्तीला किंवा तिथल्या लोकांना किंवा त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांना नोटीस बजावून एखादी कृती करण्यापासून रोखू शकतात. अर्थात अशी नोटीस बजावण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.

 

 

सहा महिन्यांपर्यंत लागू केले जाऊ शकते हा निर्णय

कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकतात.  कलम 144 अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो. या कलमांतर्गत कोणत्याही परिसरात 2 महिन्यांसाठी जमावबंदीचे आदेश दिले जाऊ शकतात. मात्र नागरिकांच्या जिवाला धोका आहे किंवा दंगलीची शक्यता असल्यास सरकार 6 महिन्यांसाठीदेखील जमावबंदीचे आदेश देऊ शकते. (Curfew imposed in Nanded district; What is a curfew?)

Local ad 1