महाराष्ट्राचा सांस्कृतिक दस्तऐवज : अक्षरदानचा जत्रा दिवाळी अंक
Akshardan । ‘अक्षरदान’चा दिवाळी अंक गावोगावच्या जत्रा-यात्रा-उरूस या विषयाला वाहिलेला आहे. आपल्या महाराष्ट्राला सांस्कृतिक वारशांची एक मोठी समृद्ध परंपरा आहे. त्या परंपरेची अनेक रूपे गावागावांत पाहायला मिळतात. (Cultural Document of Maharashtra Akshardan’s Jatra Diwali Issue)
नाना रूपांनी मनात ठाण मांडून बसलेल्या वारी, उत्सव, सोहळे, जत्रा-यात्रा-उरूस हे त्याच सांस्कृतिक समृद्धतेचं प्रतीक. ‘गावोगावच्या जत्रा’ या विभागातून जत्रेची नाना रूपं शिवाजी अंबुलेकर, डॉ. सुभाष शेकडे, राजेंद्र केरकर, प्रमोद मुनघाटे, योगीराज वाघमारे, डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे, आनंद विंगकर, इंदुमती जोंधळे, श्रीरंग गायकवाड आदी लेखकांनी उभी करताना त्या-त्या गावच्या जत्रांचे अतिशय खुमासदार शैलीत वर्णन केले आहे. (Cultural Document of Maharashtra Akshardan’s Jatra Diwali Issue)
‘आठवणीतील जत्रा’ या विभागात महावीर जोंधळे आणि इंद्रजित भालेराव यांचे अनुभवजन्य लेखन वाचनीय आहे. ‘जत्रा आणि…’ या विभागातील हिंदी चित्रपटातील जत्रा – डॉ. मिलिंद दामले, मराठी चित्रपटातील जत्रा – डॉ. राजेंद्र थोरात, जत्रेतला तमाशा – समीर गायकवाड, तर साहित्यातील जत्रा – डॉ. माधवी खरात हे लेख अभ्यासपूर्ण आहेत. ‘जत्रेच्या कविता’ या विभागात संतोष पवार, जितेंद्र कुवर, भगवान निळे, विशाखा विश्वनाथ आदींच्या कविता असून, डॉ. मुकुंद कुळे, डॉ. साहेब खंदारे, सुरेश नाईक, युवराज पाटील आदींनी सांगितलेल्या जत्रेच्या आठवणी रंजक आहेत. ‘जत्रेच्या कथा’ विभागात अमृता देसर्डा, सुचिता घोरपडे आणि प्रियांका पाटील यांनी कथालेखन केले आहे. अक्षरदान अंक महाराष्ट्रातील जत्रा-यात्रा-उरूस यांचा एक दस्तऐवज ठरला आहे. (Cultural Document of Maharashtra Akshardan’s Jatra Diwali Issue)
संपादक : मोतीराम पौळ
पाने: २०० किंमत : २५० रुपये