नांदेड Nanded news : नांदेड जिल्ह्यात 31 ऑगस्टपासून ते 14 सप्टेंबर 2021 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. (Crowd ban, arms embargo in Nanded, district) त्यामुळे पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आढळून आल्यास कारवाई केली जाणार असून, त्याचे अधिकार पोलिसांना (Nanded Superintendent of Police) देण्यात आले आहेत, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी (Additional Collector Nanded) कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 14 सप्टेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी, (Five or more people cannot come together) या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. (Crowd ban, arms embargo in Nanded, district)
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड (Nanded district Superintendent of Police) यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील. (Crowd ban, arms embargo in Nanded, district)