Crop Insurance I पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीस कळवावी : जिल्हाधिकारी
Crop InsuranceI नांदेड : जिल्ह्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी नाल्यांना पुर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान झाले असून, विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसुचना शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. (Crop loss information should be reported to the insurance company)
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमूळे नुकसानग्रस्त झाल्यामूळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. या जोखीमेंअंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पाणी ओसंडून वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. (Crop loss information should be reported to the insurance company)