...

पीक विम्याचा परतावा मिळाला ; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच ; तब्बल 57 रुपये प्रति गुंठा

नांदेड : जिल्हयातील खरीप हंगामात (Kharif season in Nanded district) शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा संरक्षण घेतले. त्यासाठी विम्याचा हप्ताही भरला. यंदा पावसाची उघडीप आणि अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे विम्याचा परतावा मिळेल, अशी अपेक्षा होती. सोमवारी परताव्याची रक्कम जमाही झाली.पण विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टाच केली. म्हणजे काही शेतकऱ्यांना 65 रुपये गुंठा तर एका शेतकऱ्याला तब्बल 28 रूपये गुंठा परतावा मिळाला. त्यामुळे विमा कंपनी आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. (Crop insurance amount accrued; Receipt of Rs 65)

 

 

यांदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी (By farmers) पिकांचा पंतप्रधान पीक विमा (Pm crop insurance) उतरवला आहे, (The Prime Minister took out crop insurance) त्यांना आज सोमवारपासून नुकसान भरपाईचा मोबदला बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विमा कंपनीने Rtgs द्वारे परतवा जमा ही केला जात आहे. त्यानुसार बँकेत पैसे जमा झाल्याचा मॅसेज (Message of deposit in bank) शेतकऱ्यांच्या मोबाईलवर खणखणत आहे. परंतु, जमा झालेले रक्कम पाहून शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. (Crop insurance amount accrued; Receipt of Rs 65)

 

 

 

कंधार तालुक्यातील बोरी येथील ओम पांडुरंग मरवाळे या शेतकऱ्याने 60 गुंठे क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतले, त्याचा पंतप्रधान पीक विमा योजनाअंतर्गत 576 रुपये भरून विमा उतरवला. बोरी हे गाव मन्याड नदी शेजारी आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोयाबीनचे पीक वाया गेले. मरवाळे यांनी पीक विम्याचा परतावा मिळेल या अपेक्षेने विमा कंपनीला तात्काळ म्हणजेच 72 तासांच्या आत नुकसानीची माहिती सादर केली. 100 टक्के नुकसान झाले असून, सुमारे 28 हजार 800 रुपये परतावा मिळणे अपेक्षित होते. परंतु अवघे 3410 रुपये बँकेत जमा झाले. ही रक्कम कोणत्या निकषानुसार मिळाली, हे समजायला मार्ग नाही, असे महवाळे यांनी MH Times सोबत बोलताना सांगितले. (Crop insurance amount accrued; Receipt of Rs 65)

 

 

शेतकऱ्यांचा आवाज कोण ऐकणार ?

राज्यात एसटी महामंडळचे कर्मचारी संपावर आहेत, त्याकडे लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नाही. परिणामी हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे यंदा पावसाने दिलेली उघडीप आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. शेतकरी राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करत आहे. मदतीची घोषणा ही झाली. पण प्रत्यक्षात मदत कधी मिळणार याविषयी कोणतीही स्पष्टता नाही. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. आता तो ही मिळाला, पण तो अतिशय तुटपुंजा. योग्य परतावा मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत, ते सोशल मीडियावर व्यक्त होत असून, त्यांचा आवाज सरकार ऐकणार आहे का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

Crop insurance amount accrued; Receipt of Rs 65
Crop insurance amount accrued; Receipt of Rs 65

 

Local ad 1