अवकाळी पावसाने 230 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित

पुणे :  जिल्ह्यात मागील दोन दिवसात विजेच्या कडकडाटासह वादळी वार्‍यासह अवकाळी पावसामुळे  230.84 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर खेड तालुक्यात वीज अंगावर पडून 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून नजर अंदाज पंचनामे तयार करण्यात आले असून, पाच तालुक्यातील 19 गावे पूर्णतः बाधित झाले आहेत. (230 hectares of crop damage due to unseasonal rains in Pune district)

 

 राज्यात मागील आठवडाभरापासून ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून पुणे शहरासह जिल्ह्यातील मावळ, भोर, खेड, इंदापूर आणि आंबेगाव तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस झाला आहे. पाचही तालुक्यात 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, 701 शेतकर्‍यांचे 230. 84 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमध्ये केळी, आंबा, ज्वारी, कांदा, शेवगा, पेरू, कांदयासह, ज्वारी, बाजरी, गहू आणि इतर भाजीपाल्याला तडाखा बसला आहे. (230 hectares of crop damage due to unseasonal rains in Pune district)

 

         इंदापूर तालुक्यात 9.1 मिमी पावसाची नोंद?झाली असून एक गाव पूर्णतः बाधीत झाले आहे. इंदापूर तालुक्यात शहरालगत असणार्‍या मोरे मळ्यात नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाने पेट घेतल्याने नुकसान झाले आहे. सुदैवाने दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नाही. त्या पाठोपाठ वेल्हा तालुक्यात 4.7 मिमी पाऊस झाला असून येथील पंचनामे सुरू आहेत, तर खेड तालुक्यात 1.1 मिमी पाऊस झाला असला, तरी सर्वाधिक 13 गावे बाधित झाले आहेत.

 

 

हवेली तालुक्यात लोणी काळभोर येथे केरबा वगरे यांच्या घरावर वीज पडून घराच्या भींतींनी तडे जात घरातील घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत, तर तालुक्यांच्या विविध 35 ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. (230 hectares of crop damage due to unseasonal rains in Pune district)

 

वादळी वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडलेल्या ठिकाणी वीजेच्या तारा तुटल्या असून काही ठिकाणी खांबे कोलमडली असल्यान वीज पुरवठा खंडीत झाला होता, तो वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. इतर तालुक्यात महसूल मंडलनिहाय नुकसानीचे पंचनामे सुरू असून याबाबत अहवाल तयार करून राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. (230 hectares of crop damage due to unseasonal rains in Pune district)


तालुकानिहाय बाधित गावांची संख्या आणि क्षेत्र

तालुका  गावे      क्षेत्र (हेक्टरमध्ये)
मावळ      3               0.40
भोर         1               1.20
खेड         13            221.84
इंदापूर      1              0.40
आंबेगाव   1              7.00
   एकूण      19          230.84

Local ad 1