Demanded Bribe । गाय गोठ्याच्या बिलासाठी लाच मागणाऱ्या कनिष्ठ सहायकावर गुन्हा

Demanded Bribe । पुणे : तक्रारदारांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) (मनरेगा) पंचायत समिती गेवराई येथून गाय गोठा मंजूर झाला होता. तक्रारदारांनी काम पूर्ण करुन कामाचे बिल सादर केले. बिलातील 57 हजार रुपयांची मागणी नागपूर कार्यालयाकडे करण्यासाठी पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायकाने दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. या तक्रारीची पडताळणीत लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime against junior assistant who demanded bribe for cow cow bill)

 

 

गोवर्धन उत्तमराव मुळे (वय -37 वर्ष, व्यवसाय नोकरी, कनिष्ठ सहाय्यक, पंचायत विभाग, जिल्हा परिषद बीड रा.लिंबागणेश ता. जि.बीड (वर्ग -3), असे लाच घेतना अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

एका 57 वर्षिय तक्रारदार यांना मनरेगाअंतर्गत गाय गोठा मंजूर झाला होता. गाय गोठ्याचे काम तक्रारदार यांनी पूर्ण करून बिल मंजुरीसाठी पंचायत समिती गेवराई येथे सादर केले बिलावर स्कुटणी करुन गाय गोठ्याचे कुशल बिलाची रक्कम 57 हजार 114 रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद बीड येथे पाठवण्यात आले होते.

 

 

बिलाच्या प्रस्तावावर काय कारवाई झाली का हे पाहण्यासाठी तक्रारदार मुळे यांना जाऊन भेटले . त्यावेळी मुळेने प्रस्तावित बिलावर नागपूर येथून निधीची मागणी करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची पंचासमक्ष मागणी करून लाच रक्कम स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले. त्यांच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.

 

 

ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, प्रभारी अपर पोलिस अधीक्षक राजीव तळेकर, पोलिस उप अधीक्षक शंकर शिंदे, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनूस शेख ,सापळा पथक अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, भरत गारदे यांनी ही कारवाई केली.

 

Local ad 1