दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण भागात दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना (Gharkul scheme) तयार करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme) धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज येथे दिले. (Create a separate Gharkul scheme for disabled and dependents: Chief Minister Eknath Shinde)

 

 

सह्याद्री अतिथीगृह येथे आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांच्या मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल (Hakar Minister Atul Save, MLA Bachu Kadu, Rajkumar Patel) यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.  (Create a separate Gharkul scheme for disabled and dependents: Chief Minister Eknath Shinde)

 

यावेळी आमदार कडू यांनी दिव्यांग तसेच गावोगावी पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी घरकुल योजना असावी अशी मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वतंत्र घरकुल योजना तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. राज्यात बांधकाम महामंडळाच्या धर्तीवर घरेलु कामगार यांच्यासाठी मंडळ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शेतमजुरांसाठी योजना करण्याबाबतच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

चिखलदरा येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक केला जात आहे. त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीतूनच केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी संवाद साधला आणि या कामाला वन विभागाकडून आवश्यक ते सहकार्य मिळण्याची मागणी केली. या बैठकीत अचलपूर जिल्हा निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, माधान ता. चांदूरबाजार येथे शासकीय सिट्रस इस्टेट करणे, फीन ले मील पुर्ववत सुरू करणे आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामुद्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. (Create a separate Gharkul scheme for disabled and dependents: Chief Minister Eknath Shinde)
Local ad 1