(covid vaicineshan) लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे आदेश

छपरा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर यांना सर्वप्रथम कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.  मात्र, अनेकांनी लसीकरणामुळे इतर आजार उद्भवतील या भितीने लसीकणाकडे पाठ फिरवली. मात्र, आता आशा कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करण्याचा आदेश बिहारमधील छपरा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  डॉ. निलेश रामचंद्र देवरे यांनी दिले आहेत. (covid vaicineshan)

करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सध्या लसीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र आजही लसीकरणासंदर्भात अनेक भागांतील जनतेमध्ये भीती दिसून येत आहे. लस घेण्यासाठी अनेक ठिकाणी खास करुन ग्रामीण भागातील लोक पुढे येताना दिसत नाहीत. त्यामुळेच बिहारमधील छपरा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश जारी केला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी असलेल्या परंतु लस घेतली आहे, अशांचे वेतन पुढील आदेश येईपर्यंत रोखण्याचे आदेश दिले आहेत. (covid vaicineshan)

छपराचे जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी हा आदेश जारी केला आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर करोनाची लस घ्यावी आणि त्यासंदर्भातील माहिती कार्यालयाला द्यावी असेही आदेशात नमूद केले आहे. 

Local ad 1