पुणे : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींचा वापर केला जात आहे. या दोन्ही लसींचा दुसरा डोस घेण्यासाठी वेगवेळी कालमर्यादेत निश्चित करुन देण्यात आली आहे. सध्या कोविशील्ड लस उपलब्ध होत असून, कोव्हॅक्सिन लसींचे पुरेशे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा दुसरा कधी मिळणार, थेट असा सवाल पहिला डोस घेतलेल्या नागरिकांकडून केला जात आहे. (Covaxin second dose)
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड अशा दोन प्रमुख कोरोना लसींचा उपयोग केला जात आत आहे. सध्या राज्यात कोविशिल्ड लसीचे डोस मोठ्या प्रामाणात उपबल्ध होत आहेत. तर कोव्हॅक्सिनचे डोस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. कोरोना लस घेताना प्रत्येक लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये ठराविक अंतर असणे आवश्यक आहे. यानुसार कोवॅक्सिन लस घेतल्यास पहिल्या डोसनंतर 4 ते 6 आठवड्यांच्या आत दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. अनेकांची ही कालमर्यादा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे दुसरा डोस वेळेवर मिळले की नाही, याविषयी नागरिकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे ते दुसरा डोस कधी मिळणार असा सवाल करत आहेत. (Covaxin second dose)