शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना न्यायालयाचा दिलासा, ईडीची मागणी फेटाळली

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्या विरोधात ईडीने जामीन रद्द करावा अशी मागणी पीएमएलए विशेष न्यायालयात केली होती. परंतु न्यायालयाने ईडीचा अर्ज फेटाळला असून, खासदार संजय राऊत यांच्या जामिन्याचा मार्ग भोपळा झाला आहे लवकरच बाहेर येणार आहेत. (Court relief to Shiv Sena MP Sanjay Raut, ED’s demand rejected)

 

 

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना पीएमएलए विशेष कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला असून स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे (Court relief to Shiv Sena MP Sanjay Raut, ED’s demand rejected)

 

ईडी या जामिनाच्याविरोधात हायकोर्टात अपील करणार आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आज संध्याकाळीच तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे मागील 100 दिवसांपासून तुरुंगात आहेत. विशेष कोर्टाच्या निर्णयाविरोधात ईडी आजच हायकोर्टात अपील करण्याची शक्यता आहे. विशेष कोर्टाने पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत आणि प्रविण राऊत या दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. (Court relief to Shiv Sena MP Sanjay Raut, ED’s demand rejected)

Local ad 1