(Nanded corona update) नांदेड जिल्ह्यात 154 व्यक्ती कोरोना बाधित
नांदेड : जिल्ह्यात 1 हजार 641 अहवालापैकी 154 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 103 एवढी झाली असून, यातील 81 हजार 918 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 991 असून 123 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Nanded corona update)
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (Nanded corona update)
दिनांक 16 व 17 मे 2021 या दोन दिवसांच्या कालावधीत 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 816 एवढी झाली आहे. दिनांक 16 मे 2021 रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे शिवशंकरनगर किनवट येथील 80 वर्षाचा पुरुष, मुदखेड येथील 45 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड नांदेड येथे लोहा येथील 60 वर्षाची महिला, हदगाव तालुक्यातील आष्टी येथील 58 वर्षाचा पुरुष,
मुदखेड तालुक्यातील जवळा येथील 60 वर्षाची महिला, आश्विनी कोविड रुग्णालयात शारदानगर नांदेड येथील 71 वर्षाचा पुरुष, यशोसाई कोविड रुग्णालयात फत्तेपूर नांदेड येथील 35 वर्षाचा पुरुष, लोटस कोविड रुग्णालयात नायगाव तालुक्यातील नरसी येथील 35 वर्षाचा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णालयात भोकर येथील 58 वर्षाची महिला, डेल्टा कोविड रुग्णालयात देगलूर तालुक्यातील टाकळी येथील 66 वर्षाचा पुरुष तर 17 मे रोजी भगवती कोविड रुग्णालयात पुरुषार्थनगर नांदेड येथील 70 वर्षाची महिला, नायगाव तालुक्यातील राहेर येथील 65 वर्षाच्या पुरुष यांचा समावेश आहे. (Nanded corona update)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 66, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 88, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 67, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत. (Nanded corona update)