नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतोय

नांदेड : जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या 134 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आला आहे. आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 7, नांदेड ग्रामीण 2, धर्माबाद 1, कंधार 1, मुदखेड 1 तर अँटीजेन तपासणी द्वारे कंधार तालुक्याअंतर्गत 1 असे एकुण 13 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. (Corona threat is increasing in Nanded district) 

 

 

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 4 एवढी झाली असून यातील 1 लाख 268 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 44 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. (Corona threat is increasing in Nanded district) 

 

 

नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 2 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरणात 18, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 24, अश्विनी हॉस्पिटल 2 असे एकुण 44 व्यक्ती उपचार घेत आहेत.(Corona threat is increasing in Nanded district) 

Local ad 1