महाराष्ट्राला दिलासा..! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी तज्ज्ञ काय म्हणतात पहा..

Corona Third Wave । नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आणि शक्यता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकार यांनी आरोग्य सेवा सक्षम करण्यावर भर दिला आहे. (Corona third wave in maharashtra october) परंतु आता तज्ज्ञांनी दिलेली माहिती, महाराष्ट्रासाठी दिलासादायक आहे. तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट येण्याची शक्यता फारशी नाही. ऑक्टोबरच्या आसपास तिसरी लाट आली तरी, ती दुसऱ्या लाटेपेक्षा कमी प्रभावी असेल आणि कमी प्रमाणात जीवितहानी होईल, सांगितले आहे. 

केंद्र सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य (Central task force members) यावर भाष्य करण्याचे टाळत आहेत. पण, काही सदस्यांकडून देण्यात येत असलेल्या माहितीनुसार तिसरी लाट येणार नाही. सेंट्रल कोरोना टास्क फोर्सचे काही वरिष्ठ सदस्यांच्या मतानुसार कोरोनाचे नवे रुग्ण हळू हळू कमी होत आहेत. ऑगस्टच्या अखेरीस महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने कमी होईल, असा अंदाज आहे. देशातील काही राज्ये वगळता, बहुतेक राज्यांमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. ऑगस्टच्या अखेरीस, भारतातील कोरोना प्रत्येक दिवसाची रुग्णसंख्या 20 हजारांपेक्षा कमी असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.(Corona third wave in maharashtra october)

लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पूर्णपणे कमी होईल. कोरोना संसर्ग झाला तरी रुग्णालयात दाखल होण्याची गरज राहणार नाही, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. पुढील तीन आठवड्यांनंतरच तिसऱ्या लाटेबद्दल खरा अंदाज बांधता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. (Corona third wave in maharashtra october) 

तिसऱ्या लाटेच्या शक्यतेविषयी निश्चितपणे काहीही सांगितले जाऊ शकत नाही. पण तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटे इतकी प्राणघातक ठरणार नाही, हे नक्की असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या यांनी सांगितले आहे. (Corona third wave in maharashtra october)

Local ad 1