नांदेडमध्ये कोरोना लागला उतरणीला, आज आढळले केवळ 54 कोरोना बाधित

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 158 अहवालापैकी केवळ 54 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर अँटिजेन तपासणीद्वारे 8 अहवाल बाधित आले आहेत. (Corona started descending in Nanded)

 जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 590 एवढी झाली असून यातील 98 हजार 766 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 140 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Corona started descending in Nanded)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे मुखेड तालुक्यातील हातरळ येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा 7 फेब्रुवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 684 एवढी आहे. (Corona started descending in Nanded)

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 28, लोहा 1, परभणी 4, वाशीम 1, बिलोली 1, मुदखेड 1, उमरखेड 1, देगलूर 2, मुखेड 1, हिंगोली 2, हदगाव 1, नायगांव 2, लातूर 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा8 असे एकुण 54 कोरोना बाधित आढळले आहे. (Corona started descending in Nanded)

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 199, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 77, खाजगी रुग्णालय 8 असे एकुण 289 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 22, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 538, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 553, खाजगी रुग्णालय 25, असे एकुण 1 हजार 140 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Corona started descending in Nanded)

Local ad 1