नांदेड जिल्ह्यात आज कोरोनाने गाठला उच्चांक ; आज किती आढळले रुग्ण
नांदेड : शनिवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 258 अहवालापैकी तब्बल 857 जण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 749 तर अँटिजेन तपासणीद्वारे 108 अहवाल बाधित आले आहेत. तर दुसरीकडे 619 रुग्ण बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या बधितांमध्ये नांदेड महापालिका क्षेत्रातील 480 जणांचा समावेश आहे. (Corona reaches high in Nanded district today)
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 258 अहवालापैकी 857 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 749 तर अँटिजेन तपासणीद्वारे 108 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 97 हजार 709 एवढी झाली असून यातील 91 हजार 1 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 50 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.