(The corona positive patient arrived at the examination center wearing a PPE kit) पीपीई किट घालून कोरोना बाधित पोहोचला परिक्षा केंद्रावर
औरंगाबाद : रविवारी राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पुर्व परिक्षा होती. ही परिक्षा कोरनाच्या पार्श्वभूमिवर पाचवेळी पुढे ढकलण्यात आली. पुन्हा ती पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यी संतप्त झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला तारीख जाहीर करावी लागली. मात्र, कोरोना बाधित परिक्षार्थी असेल तर त्याच्यासाठी पीपीई किट घालून त्यांना परिक्षा देण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार औरंगाबादेत कोरोनाबाधितानेही हजेरी लावली आहे. (The corona positive patient arrived at the examination center wearing a PPE kit)
औरंगपुरा येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात हा कोरोनाबाधित परीक्षार्थी सकाळी रुग्नवाहिकेतून हजर झाला. परीक्षार्थी रुग्नवाहिकेतून उतरुन सरस्वती भुवन कला महाविद्यालयासमोर उभा राहिला. मात्र, प्रशासनाने तुमची व्यवस्था सरस्वती भुवन शाळेत केल्याचे सांगण्यात आले. आधीच पीपीई कीट घालून आलेला परीक्षार्थी हातात पाण्याची बॉटल घेऊन गेटवरुनच पायी परीक्षा खोलीपर्यंत गेला. पीपीई कीट घालून आलेला परीक्षार्थी पाहून इतर परिक्षार्थी आणि परवेक्षक दचकलेच. तर इतर परीक्षार्थीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन परिक्षा देत असल्याचे दिसन येत होते. (The corona positive patient arrived at the examination center wearing a PPE kit)