धक्कादायक : नांदेड जिल्ह्यात पुन्हा वाढतायेत कोरोना रुग्ण
नांदेड जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 1 हजार 305 अहवालापैकी 9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 9 बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 226 एवढी झाली असून यातील 87 हजार 521 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या 48 रुग्ण उपचार घेत असून, त्यातील 2 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. (Shocking: Corona patients are on the rise again in Nanded district)
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 657 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 3 व्यक्तींला सुट्टी देण्यात आली. 48 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 39, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 5 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Shocking: Corona patients are on the rise again in Nanded district)