चिंताजनक : नांदेड जिल्ह्यातही वाढतायेत कोरोना रुग्ण

नांदेड  :  जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या 836 अहवालापैकी 9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेली काही दिवस रुग्णसंख्या पाच पेक्षा कमी होती, त्यामुळे जनजीवन पुर्वपदावर येत होते. त्यातच रविवारी 9 कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. (Worrying: Corona patients are also increasing in Nanded district)

 

 

Omicron update। पुणे शहर आणि जिल्ह्यात ओमायक्रॉन बाधित 46 रूग्ण आढळल्याने खळबळ

 

रविवारी आलेल्या अहवालानुसार RTPCR तपासणीद्वारे 8 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आढळले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 564 एवढी झाली असून यातील 87 हजार 884 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 25 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (Worrying: Corona patients are also increasing in Nanded district)

 

Nanded Express। नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस हडपसर येथून धावणार ; प्रवाशांसाठी हा निर्णय गैरसोयीचा

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, देगलूर तालुक्यातंर्गत 2, लोहा 1, लातूर 1 ता अँटिजेन तपासणीद्वारे लोहा 1 असे एकुण 9 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. आज 25 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 13, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, खाजगी रुग्णालय 5 अशा एकुण 25 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Worrying: Corona patients are also increasing in Nanded district)

Local ad 1