(Corona patient suicide) धक्कादायक ः कोरोनाग्रस्ताने केली आत्महत्या 

कंधार ः कोरोनामुळे नागरीकांसह प्रशासन तणावत आहे. अनेकांना त्यामुळे मानसिक आजारही होत असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले. परंतु, कोरोना झाल्यामुळे आपण मरणार, या भीतीने एकावृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कंधार शहरात घडली. (Corona patient suicide)

लोकडू शामराव कैलासे ( ७३ ) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Corona patient suicide)

कोरोनाचा सर्वाधिक धोका हा वृद्धांना असून, अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातच कंधार येथील प्रियदर्शनीनगर येथील लोकडू शामराव कैलासे या वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना विलगीकरणासाठी म्हणून ग्लो ॲन्ड ग्रो या शाळेमध्ये ठेवले होते. परंतु, कोरोनामुळे होणारा त्रास सहन न झाल्यामुळे त्यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संतोष कुंभरगावे यांच्या माहितीवरुन कंधार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. (Corona patient suicide)

Local ad 1