Coronavirus Update : कोरोना रुग्णांची वाढ कायम, गुरुवारी आढळले सव्वाचार हजार रुग्ण
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, गुरुवारीही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे आहे. राज्यात गुरुवारी तीन करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. (Corona patient growth continues, quarter to four thousand patients found on Thursday)
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात चार हजार 255 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी राज्यात 4024 रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासात 2879 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्ताची संख्या 7755183 इतकी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.87% एवढे झाले आहे. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २० हजारांच्या पार गेली आहे. (Corona patient growth continues, quarter to four thousand patients found on Thursday)
पुणे शहरात 194 रुग्णांची वाढ
राज्यात आज 4255 नव्या रुग्णांची नोंद जाली आहे. यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण मुंबईतील असून, 2366 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ ठाणे मनपा 374, नवी मुंबई मनपा 383, वसई-विरार मनपा 122, पनवेल मनपा 127, पुणे मनपा 194 कोरोना रुग्ण आढळले आहेत. इतर ठिकाणी नव्या कोरोना रुग्णांची सख्या 100 च्या आत आहे.