पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ होत असून, शुक्रवारी चिंता वाढणारी संख्येची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात 1323 जणांनी कोरोनावर मात केली आहे. (Corona outbreak raises state concerns … more than 3,000 patients registered)
कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सक्रिय रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 329 इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या नऊ हजार 191 इतकी झाली आहे. (Corona outbreak raises state concerns … more than 3,000 patients registered)
Related Posts
शुक्रवारी राज्यात 3081 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 79,04,709 झाली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्याच्या तुलने मुंबईत जवळपास सत्तर टक्के रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शुक्रवारी तब्बल 1956 दैनंदिन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ठाणे मनपा 222, नवी मुंबई मनपा 201, पुणे मनपा 135 रुग्ण आढळले आहेत. (Corona outbreak raises state concerns … more than 3,000 patients registered)