(Interest rate) ‘या’ व्यक्तींच्या कुटूंबियांना मिळणार कर्ज; व्याज दर माहित आहे काय ?
नांदेड : अनुसूचित जातीमधील कुटूंब प्रमुखाचे कोरोनामुळे निधन झालेल्या कुटूंबाना आर्थिंक व सामाजिक आधार देण्यासाठी एनएसएफडीसी योजनेंतर्गत स्माईल योजना राबविण्यात येत आहे. मृत्यू पावलेल्या कमवत्या व्यक्तीचे वय 18 ते 60 या दरम्यान असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत 1 ते 5 लाख रुपयापर्यंत कर्ज वितरीत करण्यात येणार आहे. हे कर्जाला व्याजदर 6 टक्के असून सहा वर्षात परतफेड करायची आहे. Do the families of those who died in Corona know the debt, the interest rate?
एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कोविड-19 या प्रादुर्भावामुळे अनूसूचित जातीच्या कुटूंब प्रमुखांचा मृत्यू झाला आहे. त्या कुटूंबियाचे पुनर्वसन करण्यासाठी स्माईल ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे. या योजनेच्या माहिती, अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. तपशील प्रकल्प मूल्य 1 ते 5 लाख रुपयापर्यंत यामध्ये एनएसएफडीसी 80 टक्के सहभाग तर भांडवल अनुदान 20 टक्के आहे. व्याजदर 6 टक्के असून परतफेडीचा कालावधी 6 वर्षाचा राहील. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या https://forms.gle/7mG8MecLknWGt6K7 या लिंकवर किंवा जिल्हा कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
या योजनेसाठी पात्रता अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख पर्यत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा. (कुटुंब प्रमुखांच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक), मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखांची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.