Nanded corona update : नांदेड जिल्ह्यात कोरोना वाढतोय, मंगळवारी किती बाधित आढळले जाणून घ्या..

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 408 अहवालापैकी 170 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 119 तर अँटिजेन तपासणीद्वारे 51 अहवाल बाधित आले आहेत.  (Corona is growing in Nanded district, find out how many were affected on Tuesday.)

 

 

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 315 एवढी झाली असून, यातील 87 हजार 991 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 669 रुग्ण उपचार घेत असून 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  (Corona is growing in Nanded district, find out how many were affected on Tuesday.)
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 48, नांदेड ग्रामीण 10, बिलोली 2, धर्माबाद 5, हदगाव 8, हिमायतनगर 2, लोहा 15, माहूर 2, मुदखेड 12, मुखेड 2, नायगाव 1, उमरी 3, परभणी 4, वाशीम 1, पुणे 1, बिहार 3 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 28, नांदेड ग्रामीण 5, बिलोली 6, धर्माबाद 1, देगलूर 1, हदगाव 1, कंधार 1, किनवट 5, लोहा 1, नायगाव 2 असे एकुण 170 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 42, खाजगी रुग्णालय 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यात 699 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 142, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 488, खाजगी रुग्णालय 8 अशा एकुण 699 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Corona is growing in Nanded district, find out how many were affected on Tuesday.)

Local ad 1