चिंता वाढवणारी बातमी : नांदेड जिल्ह्यात एका दिवसात तिपटीने वाढले कोरोना बाधित
नांदेड : नांदेड शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख वाढत असून, (Increasing the graph of corona in Dead city and district) नागरिकांनी कोरोना प्रतिबंधकाच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. गेले काही दिवस दररोज दहाच्या आत असलेली रुग्णसंखऱ्या मंगळवारी तिपटीने म्हणजेच 29 झाली आहे. रविवारी 9 तर समोवारी 10 रुग्ण आढळले होते. परंतु बुधवारी थेट 29 वर संख्या पोहोचली आहे. (Anxious news: Corona infestation in Nanded district tripled in one day)
जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या 812 अहवालापैकी 29 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 22 तर अँटिजेन तपासणीद्वारे 7 अहवाल बाधित आला आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 601 एवढी झाली असून यातील 87 हजार 887 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 59 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
नांदेड-हडपसर एक्सप्रेस रेल्वेचे असे आहे वेळापत्रक, जाणून घ्या !
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (Anxious news: Corona infestation in Nanded district tripled in one day)
Nanded corona update । नांदेड जिल्ह्यात 10 व्यक्ती कोरोना बाधित