धक्कादायक । नांदेड जिल्ह्यात तब्बल 474 कोरोना बाधित आढळले
नांदेड : तिसऱ्या लाटेत बुधवारी उंच्चाकी कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 2 हजार 17 अहवालापैकी 474 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 435 तर अँटिजेन तपासणीद्वारे 39 अहवाल बाधित आले आहेत. (Corona blast in Nanded district; A staggering 474 corona was found infected)
गोल्या काही महिन्यांत हि सर्वाधिक रुग्णसंख्या असून, आता नांदेडकरांनी कोरोना प्रतिबंधात्म उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 91 हजार 789 एवढी झाली असून यातील 88 हजार 26 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सध्या 1 हजार 108 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.(Corona blast in Nanded district; A staggering 474 corona was found infected)
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 328, नांदेड ग्रामीण 23, अर्धापूर 5, देगलूर 9, हदगाव 1, हिमायतनगर 1, कंधार 14, किनवट 1, लोहा 17, मुदखेड 2, मुखेड 11, नायगाव 1, उमरी 1, परभणी 5, अकोला 2, अहमदनगर 1,हिंगोली 7, पुणे 1, अमरावती 1, वाशीम 1, पंजाब 2, उत्तराखंड 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, बिलोली 6, देगलूर 1, हदगाव 4, किनवट 3, मुदखेड 4, मुखेड 1, नायगाव 1, लातूर 1 असे एकुण 474 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 29, खाजगी रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. (Corona blast in Nanded district; A staggering 474 corona was found infected)
आज 1 हजार 108 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 13, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 205, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 853, खाजगी रुग्णालय 10 अशा एकुण 1 हजार 108 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Corona blast in Nanded district; A staggering 474 corona was found infected)