काँग्रेसचे आंदोलन  : दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या घराला घेराव घालण्याचा इशारा

Congress : महागाई आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेसच्या (Congress) वतीने आज देशव्यापी आंदोलन केल जाणार आहे. दिल्लीत काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे राज्यात राजभवनाला (Raj Bhavan)  घेराव घालणार आहेत. (Congress : Warn of laying siege to Prime Minister Modi’s house in Delhi)

नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress president Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी करत आहे. या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असन, तर दुसरीकडे काँग्रेस ने महागाई आणि बेरोजगारी बाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. (Congress : Warn of laying siege to Prime Minister Modi’s house in Delhi)

 

 

काँग्रेसच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. “जंतर-मंतर (Jantar-Mantar) वगळता, नवी दिल्लीत संपूर्ण भागात CrPC कलम 144 लागू आहे. सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, रहदारीच्या कारणांमुळे 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली जिल्ह्यातील परिसरात आंदोलन, धरणे, घेरावाला परवानगी देता येणार नाही, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. (Congress : Warn of laying siege to Prime Minister Modi’s house in Delhi)

 

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्याने “लोकशाहीत आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. पोलीस परवानगी देत ​​नाहीत, ठीक आहे, रोखून दाखवा, असे अव्हान काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी दिले आहे. त्यामुळे आज पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष अटळ मानले जात आहे. (Congress : Warn of laying siege to Prime Minister Modi’s house in Delhi)

 

दिल्लीत राष्ट्रपती भवनावर मोर्चा तर विविध राज्यात राजभवनाला घेराव घालण्यास काँग्रेसने सांगितले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी ‘राजभवन घेराव’ आयोजित करण्यास सांगितले आहे, ज्यात आमदार, विधानपरिषदेचे सदस्य, माजी खासदार आणि राज्य युनिटचे वरिष्ठ नेते सहभागी होतील. (Congress : Warn of laying siege to Prime Minister Modi’s house in Delhi)

 

Local ad 1