कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांची घेतली भेट

पुणे :  कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी बंगरुळू येथे कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे (Congress National President Khargeयांची भेट घेतली. यावेळी खरगे यांनी यांचे अभिनंदन करुन धंगेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी  महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) उपस्थित होते.  मल्लिकार्जुन खरगे यांनी कसबो पेठ पोटनिवडणुकीची संपूर्ण माहिती घेतली. (Congress National President Kharge congratulated MLA Ravindra Dhangekar)

 

 

दिवसेंदिवस केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यांमधील भाजप सरकार यांच्या विरुद्धचा जनतेच्या मनातील रोष वाढत आहे. महागाई, बेकारी यामुळे त्रस्त जनतेला परिवर्तन अपेक्षित आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीचा कसबा मतदारसंघातील विजय हा दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.  (Congress National President Kharge congratulated MLA Ravindra Dhangekar)

 

मोठी बातमी : न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना सुनावली दोन वर्षाची शिक्षा 

 

महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते यांनी एकजुटीने कठोर मेहनत करुन विजय संपादन केला. याचाच अर्थ एकत्रित ताकदीने निवडणुका लढविल्या तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. आगामी काळात ही महाविकास आघाडीच्या रूपाने भाजपसारख्या जातीवादी प्रतिगामी पक्षाचा पूर्ण पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. (Congress National President Kharge congratulated MLA Ravindra Dhangekar)

Local ad 1