(Congress MP Rajeev Satav) राजीव सातव यांची प्रकृती खालावली पुन्हा व्हेंटिलेटर

पुणे :   काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली असून त्यांना जहांगीर रुग्णालयात व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले आहे. (Congress MP Rajeev Satav)

खासदार सातव यांच्यावर पुण्यातील जांहगीर या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरवातीला ते कोरोना पॉझिटिव्ह होते. मात्र नंतर कोरोनामुक्त झाले. त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग वाढला असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाती डॉक्टरांनी दिली.   (Congress MP Rajeev Satav)

 कोरोना संसर्गामुळे त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 19 दिवसांनी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यांच्यावर सामान्य वॉर्डमध्ये देखरेखीखाली उपचार करण्यात येत होते आणि लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती डॉक्टरानी दिली होती. पण त्यांची तब्येत पुन्हा खालावली आहे. (Congress MP Rajeev Satav)

Local ad 1