...

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिले “त्या” चर्चांवर स्पष्टीकरण

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून राजकीय उलथापालथ घडत आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Former Chief Minister Congress leader Ashok Chavan) काँग्रेस पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर अशोक चव्हाण यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. (Congress leader Ashok Chavan clarified on “those” discussions)

 

 

 

राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंसह 50 आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार प्रणिती शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे विधानसभेतील तब्बल ११ आमदार बहुमत चाचणीदिवशी सभागृहात वेळेत पोहोचले नव्हते. (Congress leader Ashok Chavan clarified on “those” discussions)

 

 

या घटनेनंतर काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. काँग्रेस हायकमांडनेही पक्षशिस्त मोडल्याच्या आरोपाखाली या ११ आमदारांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे, अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या. मात्र अशोक चव्हाणांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.

 

 

 

काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची जिल्हाभरात चर्चा आहे. मात्र, चव्हाण यांनी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. चर्चेला काही महत्त्व नाही. असा कुठलाही निर्णय मी घेतला नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. (Congress leader Ashok Chavan clarified on “those” discussions)

Local ad 1