नांदेड। लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाने विशेष करुन मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला भरभरुन मते दिली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. काँग्रेसने आपली 14 उमेदावारांची चौथी यादी जाहीर केली आहे. त्यात नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून अब्दुल सत्तार यांचा समावेश केला आहे. महायुती मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला असून, आमदार बालाजी कल्याणकर यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत इंगोले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे. (Congress has announced the candidature of Abdul Sattar from Nanded North Assembly Constituency)
सोलापुर दक्षिण विधानसभा मतदार संघातुन काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर झाले आहे. महाविकास आघाडीतून या आधीच ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. अमर पाटील हे उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत, तत्पूर्वीच काँग्रेसने देखील आपला उमेदवार या मतदारसंघात जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण हा मोठा प्रश्न आहे. सोलापुर दक्षिणमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटात मैत्रीपूर्ण लढत होणार की ठाकरे गट उमेदवारी माघार घेणार हे पाहणे महत्वाचे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसची तिसरी यादी जाहिर बेटमोगरेकर, निवृत्तीराव कांबळे, हंबर्डे काँग्रेसचे उमेदवार
काँग्रेसची 4 थी यादी
2.अमरेड – संजय मेश्राम
3.आरमोरी – रामदास मश्राम
4.चंद्रपूर – प्रवीण पडवेकर
5.बल्लारपूर – संतोष सिंह रावत
6.वरोरा- प्रवीण काकडे
7.नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार
8.ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे
9.नालासोपारा- संदीप पांडेय
10.अंधेरी पश्चिम- अशोक जाधव
11.शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट
12.पुणे छावणी- रमेश बागवे
13.सोलापूर दक्षिण- दिलीप माने
14.पंढरपूर- भगिरथ भालके